Skip to main content

Posts

Showing posts from December, 2017

R.AGE - शोध पत्रकारितेतील एक प्रवास

- अभिषेक भोसले R.AGE हा मलेशियामधील शोध पत्रकारिता करणाऱ्या तरूणांचा समूह. या समूहानं 10 महिने केलेल्या कामातून तयार झालेला Predator in My Phone हा महितीपट आणि या माहितीपटानंतर मलेशियामध्ये तयार झालेला लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरूद्धचा कायदा... या तरूण पत्रकारांचा हा प्रवास थक्क करणाराच नाही तर पत्रकारिता संपत चालली आहे अशी ओरड चालू असताना त्यावर शाश्वत उपाय सांगणार आहे. मलेशिया, सगळ्यांनाच माहिती असेल. पण त्याची कमी लोकांना माहिती असलेली बाजू म्हणजे तिथली लैंगिक गुन्हेगारी,  तिथं चाललेला, निर्माण झालेला शालेय मुलींच्या लैंगिक शोषणाचा बाजार. इंटरनेटचा वापर करून शालेय किंवा पौंगाडावस्थेतील मुलींशी ओळख प्रस्थापित करून त्यांना शरीर संबंध ठेवण्यास प्रवृत्त करणे. त्यांचं लैंगिक शोषण करणं आणि त्यांना विकणंही.  R.AGE हा ग्रुप म्हणजे मलेशियन वर्तमानपत्र 'द स्टार'चा मल्टीमिडिया विभाग. त्यांनी या विषयावर काम करायचं ठरवलं. 10 पत्रकारांची ही टीम. जगातल्या बहुतांश मुद्रित माध्यमांची वाचक संख्या कमी होत असताना सर्व माध्यमसंस्था ह्या ऑनलाईन आणि मल्टीमिडिया जर्नालिझममध्ये पाय र...

MeToo कॅम्पेन आणि 'इरेझर पोएट्री'

- अभिषेक भोसले  ऑक्टोंबर महिन्यात अमेरिकेतील वर्तमानपत्रांची पानं नावाजलेल्या व्यक्तींवर केल्या गेलेल्या बलात्कार, विनयभंग आणि लैगिंक शोषणाच्या आरोपांनी भरलेली दिसत होती. ही प्रकरणं जशी समोर येऊ लागली तशी त्याची तीव्रताही जगाच्या लक्षात आली. यासर्व घडामोडीतून जन्म झाला MeToo या मोहिमेचा आणि सोशल मिडियावरील हॅशटॅगचा. मोठ्या प्रमाणात जगातील तरूणी – महिलांनी #MeToo चा वापर करून स्वता : वर झालेला विनयभंग, बलात्कार आणि लैगिक शोषणाचे अनुभव सोशल मिडियावर मांडले. अनेकांनी या सर्व प्रकरणांवर आपली मतं व्यक्त केली. काहींनी याला स्त्रीमुक्तीची चळवळ सांगितलं, काहींनी चळवळ म्हणणाऱ्याची खिल्ली उडवली. पण महिलांच्या आतमध्ये साचलेला काळाकुट्ट भूतकाळ या रूपानं किमान समोर आला.  सामान्य नागरिक, महिला, कार्यकर्त्या त्यांच्यापरीने या सर्व विषयांवर व्यक्त होत होत्या. इरेझर पोएट्रीवरील लेखकाचा लेख वाचण्यासाठी  "शब्द खोडून तयार झालेली राजकीय कविता" -  https://goo.gl/uZKy4d ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्या बहुतांश व्यक्ती ह्या नावाजलेल्या होत्या. त्यामुळं त्यातील अनेकांनी बच...

एबीसी ते मटा, लोकसत्ता - माध्यमांचं चारित्र्य आणि विश्वासार्हता

- अभिषेक भोसले  ब्रेयन रॉस यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल १. अमेरिका, वार - शनिवार, एबीसी वृत्तवाहिनीच्या वर्ल्ड न्यूज टूनाईट बातमीपत्राचं प्रसारण चालू झालेलंं होतं. वृत्तवाहिनीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पणाला लागलेली असताना न्यूजरूममधील वातावरण एकदम गंभीर. एबीसी वृत्तवाहिनीसाठी २० दशकांपासून कार्यरत असलेला आणि शोध पत्रकारितेतील महत्त्वाचं नाव असलेला पत्रकार ब्रायन रॉस बातमीपत्रात येतो. काल म्हणजे शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या बातमीतील काही तथ्य चुकीचे असल्याचा खुलासा करतो. जाहिररित्या देशाची माफी मागतो. तो माफीनामा थेट प्रसारित करण्यात येतो. वृत्तवाहिनीच्या विश्वासार्हतेला लागलेल्या सुरूंगातून सावरण्याचा एबीसी वृत्तवाहिनीचा हा माझ्या दृष्टीकोनातून स्वागतार्हाय प्रयत्न  लोकसत्ताचे संपादक गिरिष कुबेर यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल  २. तीच तारीख, तोच वार, फक्त देश मात्र वेगळा. स्थळ - मुंबई. माध्यमं जागतिक नाहीत मात्र प्रादेशिक. नाव - लोकसत्ता, महानगर, जनशक्ती आणि महाराष्ट्र ट...