Skip to main content

MeToo कॅम्पेन आणि 'इरेझर पोएट्री'

- अभिषेक भोसले 

ऑक्टोंबर महिन्यात अमेरिकेतील वर्तमानपत्रांची पानं नावाजलेल्या व्यक्तींवर केल्या गेलेल्या बलात्कार, विनयभंग आणि लैगिंक शोषणाच्या आरोपांनी भरलेली दिसत होती.

ही प्रकरणं जशी समोर येऊ लागली तशी त्याची तीव्रताही जगाच्या लक्षात आली. यासर्व घडामोडीतून जन्म झाला MeToo या मोहिमेचा आणि सोशल मिडियावरील हॅशटॅगचा. मोठ्या प्रमाणात जगातील तरूणी – महिलांनी #MeToo चा वापर करून स्वता:वर झालेला विनयभंग, बलात्कार आणि लैगिक शोषणाचे अनुभव सोशल मिडियावर मांडले. अनेकांनी या सर्व प्रकरणांवर आपली मतं व्यक्त केली. काहींनी याला स्त्रीमुक्तीची चळवळ सांगितलं, काहींनी चळवळ म्हणणाऱ्याची खिल्ली उडवली. पण महिलांच्या आतमध्ये साचलेला काळाकुट्ट भूतकाळ या रूपानं किमान समोर आला. सामान्य नागरिक, महिला, कार्यकर्त्या त्यांच्यापरीने या सर्व विषयांवर व्यक्त होत होत्या.

इरेझर पोएट्रीवरील लेखकाचा लेख वाचण्यासाठी "शब्द खोडून तयार झालेली राजकीय कविता" - https://goo.gl/uZKy4d

ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्या बहुतांश व्यक्ती ह्या नावाजलेल्या होत्या. त्यामुळं त्यातील अनेकांनी बचावासाठी किंवा त्यांच्यावर झालेले आरोप नाकारण्यासाठी खुलासा करणारी पत्रकं प्रसिद्ध केली. काहींनी माफीनामे सादर केले.

ही निवेदनं जशी जशी प्रसिद्ध व्हायला लागली तशी अमेरिकेत परत एकदा इरेझर पोएट्रीची लाट आली. या माफीनाम्यांवर ह्या कविता रचल्या गेल्या. ही सगळी प्रकरणं बाहेर येत असताना तिथल्या महिला साहित्यिकांनी व्यक्त व्हायला ह्या कवितेचा मार्ग निवडला.

या सर्वांमध्ये वॉशिंग्टनमधल्या ट्रिनिटी महाविद्यालायतून लिखाण आणि कवितेमध्ये पदवी प्राप्त केलेल्या इजोबेल ओ हारे ह्या साहित्यिकेनं लिहिलेल्या कविता महत्त्वाच्या ठरल्या. त्या तेवढ्याच सकस होत्या. त्यातील काही निवडक इरेझर पोएट्री खाली देत आहे.

या सर्व कॅम्पेनमधली पहिली इरेझर पोएट्री सी.के. लुईस याच्या निवेदनावर १२ नोव्हेंबर रोजी इजोबेल ओ हारे हिनं रचली. लुईस हा अमेरिकेतील लोकप्रिय विनोदी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक आहे. त्याच्यावर पाच महिलांनी लैगिंक शोषणाचे आरोप केले होते. नंतर लुईसनं ते मान्यही केले होते. त्यासंदर्भात त्यानं एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं, त्याच पत्रकावर हारे हिनं ही कविता रचली होती.  



रिचर्ड ड्रेफ्रुस यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर तयार केलेली इजोबेल ओ हारे हिची इरेझर पोएट्री


रिचर्ड ड्रेफ्रुस यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर तयार केलेली इजोबेल ओ हारे हिची इरेझर पोएट्री
केविन स्पॅसे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर तयार केलेली इजोबेल ओ हारे हिची इरेझर पोएट्री

जेरेमी पिव्हेन याच्या निवेदनावर रचलेली इजोबेल ओ हारे हिची इरेझर पोएट्री

लेखकाचे इतर ब्लॉग - http://bhosaleabhi.blogspot.in/

ऑरोरा पेरिनियाऊ या अभिनेत्रीनं 'गर्ल्स' या प्रसिद्ध मालिकेचा लेखक मुरे मिलर याच्याविरोधात १७ नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर अभिनेत्री लेना डूनहाम हिनं मुरेच्या बचाव करणारं एक पत्र प्रसिद्ध केलं. त्यात तिनं ऑरोरा हिचं चरित्रहनन करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर एक स्त्री अभिनेत्री बलात्काऱ्याचं समर्थन कसं करू यावर वादही झालं. तर इजोबेल ओ हारे हिनं लेनानं लिहिलेला पत्राचा वापर करून इरेझर कविता लिहिली. त्यात ती म्हणते,

WE WOMEN/ SHAME WOMEN



लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा - http://movementswatch.blogspot.in/

नुकत्याच पार पडलेल्या आलाबामा सिनेट निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉय मुरे यांच्यावरही निवडणुकीच्या काळात एका तरूणीनं बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर मुरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर राई हेन्ड्रिक्स हिनं इरेझर पोएट्री लिहिली.


हार्वे वाईनस्टाईन याच्यावर ८४ महिलांनी लैंगिक शोषण, विनयभंग आणि बलात्काराचे आरोप केले होते. कदाचित हार्वेच्या नावामुळंच या सगळ्या प्रकरणाकडं जगाचं लक्ष वेधलं गेलं. काही काळानंतर हार्वेनी माफीनामाही सादर केला.

हार्वेनी सादर केलेल्या माफीनाम्यावर अनेकांनी इरेझर पोएट्री लिहिली. त्यातील एक जोव्हांना व्हॅलेन्टी हिनं तयार केलेली कविता खालीलप्रमाणे...

  

व्हॅलेन्टीनं केलेल्या ट्विटमध्ये इजोबेल ओ हारे हिच्याकडून प्रेरणा घेऊन ही कविता रचल्याचं म्हटलं आहे. 

MeToo कॅम्पेनची चर्चा सर्वत्र झाली. पण लैगिंक अत्याचाराच्या या हादरवून टाकणाऱ्या घटनांविरोधात अमेरिकेतील महिला साहित्यिकांनी साहित्याचा कवितेचा केलेला उपयोग अधिक प्रभावी होता.  

काही विशेष नोंदी

रविवारी (२४ डिसेंबर २०१७ रोजी) याच इरेझर पोएट्रीवर दै. दिव्यमराठीच्या रसिक पुरवणीत लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी तो शेअर केला. त्यातील एका पोस्ट खाली आलेल्या कमेंटबद्दलची ही थोडीशी नोंद.

कमेंट ती होती, “अस्सल कलाकाराला लिहिलेले शब्द खोडण्याची गरज नसते.”

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा - http://awhanabhi.blogspot.in/

मी स्वत: काही कवी नाही, थोडं फार लिखाण करतो ते पण साहित्यिक नाही. पण मी या गोष्टी संज्ञापनाच्या आणि चळवळींच्या दृष्टीकोनातून, आजच्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवर समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं अस्सल कलाकार वगैरे बद्दल भाष्य करण्यास मी योग्य व्यक्ती नाही. परंतु जर वर केलेल भाष्य योग्य मानलं तर मात्र अस्सल कलाकाराची व्याख्या ह्या कवितांना ग्राह्य धरून बदलावी लागेल हे मात्र निश्चित. कारण या कविता तिथल्या लोकांच्या तिथल्या साहित्यिकांच्या आजच्या काळाचं व्यक्त होण्याचं विरोध दर्शविण्याचं, सामाजिक, राजकीय भाष्य करण्याचं माध्यमं बनल्या आहेत. आणि अर्थात या कवितांमुळं तिथला साहित्यिक समकालीन बनला आहे त्यामुळं तो अस्सल आहे.    

Comments

Popular posts from this blog

चेहऱ्यावरचे मुखवटे फक्त वेगळे

- अभिषेक भोसले सर्व पक्ष निवडणुकीचे उमेदवार जाहिर करण्यात व्यस्त आहेत. याद्यांवर याद्या प्रसिद्ध होत आहेत. वर्तमानपत्रांचे मथळे त्यासंंबधीच्या बातम्यांनी भरून जात आहेत. अशात काही महत्त्वाचे मथळे आपल्या नजरेतून सुटण्याची शक्यता आहे. त्यातला 24 मार्चचा बीबीसी संकेतस्थळावरचा हा एक मथळा ' कांग्रेस सरकार ने छत्तीसगढ़ में अडानी को दिया कोयला खदान का ठेका, उठे सवाल '  आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाची ही महत्त्वाची बातमी आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील गिधमुडी आणि पतुरिया  इथल्या कोळसा खाणी राज्य सरकारकडून अदाणी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्तीसगडमध्ये कॉग्रेसचं सरकार आहे.  हो, तेच कॉग्रेसचं सरकार ज्यांनी अदाणी समूहाला सातत्यानं विरोधी पक्ष असताना विरोध दर्शविला होता. राहूल गांधी हे त्या पक्षाचे महासचिव आहेत.  कॉग्रसेच महासचिवांनी 2015 मध्ये याच भागाचा दौरा करत तत्कालिन भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठ्या उद्योग समूहांना मदत मुद्दयावरून घेरलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप सरकार आदिवासींच्या जमिनी अद...

एबीसी ते मटा, लोकसत्ता - माध्यमांचं चारित्र्य आणि विश्वासार्हता

- अभिषेक भोसले  ब्रेयन रॉस यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल १. अमेरिका, वार - शनिवार, एबीसी वृत्तवाहिनीच्या वर्ल्ड न्यूज टूनाईट बातमीपत्राचं प्रसारण चालू झालेलंं होतं. वृत्तवाहिनीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पणाला लागलेली असताना न्यूजरूममधील वातावरण एकदम गंभीर. एबीसी वृत्तवाहिनीसाठी २० दशकांपासून कार्यरत असलेला आणि शोध पत्रकारितेतील महत्त्वाचं नाव असलेला पत्रकार ब्रायन रॉस बातमीपत्रात येतो. काल म्हणजे शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या बातमीतील काही तथ्य चुकीचे असल्याचा खुलासा करतो. जाहिररित्या देशाची माफी मागतो. तो माफीनामा थेट प्रसारित करण्यात येतो. वृत्तवाहिनीच्या विश्वासार्हतेला लागलेल्या सुरूंगातून सावरण्याचा एबीसी वृत्तवाहिनीचा हा माझ्या दृष्टीकोनातून स्वागतार्हाय प्रयत्न  लोकसत्ताचे संपादक गिरिष कुबेर यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल  २. तीच तारीख, तोच वार, फक्त देश मात्र वेगळा. स्थळ - मुंबई. माध्यमं जागतिक नाहीत मात्र प्रादेशिक. नाव - लोकसत्ता, महानगर, जनशक्ती आणि महाराष्ट्र ट...