Skip to main content

Posts

चेहऱ्यावरचे मुखवटे फक्त वेगळे

- अभिषेक भोसले सर्व पक्ष निवडणुकीचे उमेदवार जाहिर करण्यात व्यस्त आहेत. याद्यांवर याद्या प्रसिद्ध होत आहेत. वर्तमानपत्रांचे मथळे त्यासंंबधीच्या बातम्यांनी भरून जात आहेत. अशात काही महत्त्वाचे मथळे आपल्या नजरेतून सुटण्याची शक्यता आहे. त्यातला 24 मार्चचा बीबीसी संकेतस्थळावरचा हा एक मथळा ' कांग्रेस सरकार ने छत्तीसगढ़ में अडानी को दिया कोयला खदान का ठेका, उठे सवाल '  आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाची ही महत्त्वाची बातमी आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील गिधमुडी आणि पतुरिया  इथल्या कोळसा खाणी राज्य सरकारकडून अदाणी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्तीसगडमध्ये कॉग्रेसचं सरकार आहे.  हो, तेच कॉग्रेसचं सरकार ज्यांनी अदाणी समूहाला सातत्यानं विरोधी पक्ष असताना विरोध दर्शविला होता. राहूल गांधी हे त्या पक्षाचे महासचिव आहेत.  कॉग्रसेच महासचिवांनी 2015 मध्ये याच भागाचा दौरा करत तत्कालिन भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठ्या उद्योग समूहांना मदत मुद्दयावरून घेरलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप सरकार आदिवासींच्या जमिनी अद...
Recent posts

जेव्हा सैन्यानंच वृत्तपत्रांना खोटा फोटो पुरविला होता...

- अभिषेक भोसले युद्ध आणि त्यात निर्माण होणार्या फेक बातम्या किंवा फोटो ही फक्त आजची समस्या नाहीये. म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या एअर स्ट्राईक नंतर आम्ही माध्यमांनी जी काही खोट्या छायाचित्रांची आणि व्हिडिओ निर्मितीची क्रियटिव्हिटी दाखविली त्याबद्दल शॅम्पेनच्या बाटल्या उडवायचं काही कारण नाही. कारण तुमच्या  पूर्वीच  खुद्द भारतीय सैन्याच्या माहिती अधिकार्यांनी हा पराक्रम करून दाखविला आहे. एक लक्षात ठेवा, जिथं संघर्ष असतो तिथं बातमी. जिथं संघर्ष असतो तिथं पराक्रम, शौर्याच्या कथा जन्माला येतात. पण त्या शौर्याची मोनोपॉली जेव्हा निर्माण करायची तेव्हा तशा बातम्या, छायाचित्रं आणि व्हिडीओ माध्यमात पेरावे लागतात. अर्थात हे शौर्याचं राजकारण असतं. जेव्हा संघर्ष चालू असतो तेव्हा थेट सीमेवरून वार्तांकन करण्याला मर्यादा असतात. त्यावेळी युद्धासंबंधी सैन्याकडून होणार्या ब्रिफ्रींग किंवा पत्रकार परिषदा ह्या युद्धात घडणार्या घडामोडींसंबंधीच्या एकमेव विश्वासार्ह स्त्रोत मानल्या जातात. पत्रकार परिषदांमधून तुमच्या समोर येणारी माहिती ही सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्या...

यवतमाळवर बोलू काही...

- अभिषेक भोसले यवतमाळ महाराष्ट्राच्या मध्य पूर्व भागात वसलेलं आहे. सोबत दिलेल्या फोटोतील नकाशामध्ये जो निळ्या रंगाचा भूप्रदेश आहे तो यवतमाळचाच आहे. त्या भागाला विदर्भ असंही म्हणतात. म्हणजे यवतमाळपासून पलीकडं विदर्भच. यवतमाळमध्ये अप्सरा, सरोज, राजकुमार, बरखा, दिप्ती, संजय, वर्षा, मंगला, शंकर तसंच ई-स्क्वेअर एलिमेन्ट्स या नावाची सिनेमागृहं आहेत. 2015 मध्ये राजवाडे अँड सन्स, 2016 मध्ये वजनदार आणि 2017 मध्ये गुलामजाम नावाचे सिनेमा या सिनेमागृहांमध्येही लागले होते. यवतमाळ, दिग्रस, राळेगाव, बाभूळगाव, उमरखेड, कळंब, अरणी, महागाव, वणी, धारवा, केळापूर, मारगांव, नेर, झरी जमनी, पुसद इत्यादी तहसील या जिल्ह्यात आहेत. या सगळ्या ठिकाणी मिळून एकत्रित 2077144  एवढी आपल्यासारखीच माणसं राहतात. म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण माणसांच्या 2.63 टक्के. ही 2.63 टक्के माणसं मराठी बोलतात, ऐकतात, लिहितात. त्यामुळं वर नावं लिहिलेल्या सिनेमागृहांमध्ये जाऊन कधी कधी मराठी चित्रपटही पाहतात.  काही माणसं गोंड राजा, गोंड प्रधान, कळम, आंध आणि बंजारा या आदिवासी समुदायातील असल्या कारणानं त्यांना गुलाम...

फेसबूकचं भाजपशी झेंगट आहे का? 

- अभिषेक भोसले आजवर फेसबूकवर माहितीच्या बाजारासाठी टीका झालीय. पण आता फेसबूकवर राजकीय पक्षपाताचा आरोप होतोय. फेसबूक समूह हा भाजप आणि नरेंद्र मोदींसाठी राबत असल्याचा पुराव्यांसह आरोप करणारे पाच लेख परंजय गुहा ठाकूरता आणि सिरिल सॅम या पत्रकारांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर लिहिलेत.  ................. ‘आय एम अ ट्रोल’ हे स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल देशाला नव्याने समजू लागला. या पुस्तकात आयटी सेलचं काम, त्यातून तयार होणाऱ्या पोस्ट आणि ते करत असलेलं ट्रोलिंग याबदद्ल सविस्तर लिहिलं होतं. सोशल मीडिया हा या आयटी सेलचा मुख्य प्लॅटफॉर्म होता. या सगळ्या सोशल मीडियावर भाजपच्या आयटी सेलने पसरवलेल्या मजकुराने काय काय केलं, ते आपण पाहत आहोतच.  काही महिन्यांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’ या शोध पत्रकारिता करणाऱ्या वेबसाईटने माध्यम समूह आणि सत्ताधारी पक्ष संघटना यांच्यातला संबंध समोर आणण्यासाठी अनेक माध्यम समूहांतल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं. त्यात काही वेबसाईटचाही समावेश होता. ‘पेटीएम’च्या स्टिंग ऑपरेशनमधे काही धक्कादायक गोष...

नागरिकांच्या 'प्रायव्हसी'वर सरकारचाच दहशतवादी हल्ला

- अभिषेक भोसले देशातील दहा संस्था कोणाच्याही संगणकातील माहिती आता त्यांच्या परवानगीशिवाय काढू शकणार आहेत. सत्ताधारी म्हणत आहेत, दहशतवादी कारवाया आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे करण्यात येणार आहे. Intelligence Bureau, Narcotics Control Bureau, Enforcement Directorate, Central Board of Direct Taxes, Directorate of Revenue Intelligence, CBI, National Investigation Agency, Cabinet Secretariat (R&AW), Directorate of Signal Intelligence (in Jammu and Kashmir, North-East and Assam only) and the Delhi Police Commissioner या संस्थांना आता कोणाच्याही संगणकात जाऊन त्यांच्या माहितीवर लक्ष ठेवता येणार आहे. बरं सत्ताधारी पक्षावर टिका हे राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे बनविले जात असताना ह्या नव्या निर्णयाचा वापर कशासाठी केला जाईल यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. सत्ताधार्यांविरोधात बोलणारे आवाज बंद करण्यासाठी ह्याचा मोठा प्रमाणात उपयोग केला जाईल हे इथल्या नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं. दहशतवादी कृत्यांमध्ये संगणक, इंटरनेटचा वापर होत असताना त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक यंत्रणा आहेत. तपासाच्या पद्धत...

वॉर्निंग - 1 - (अभिषेक भोसले)

धर्माबादेतल्या बिलोलीकडं जाणाऱ्या रेल्वे फाटकाजवळच्या चहाच्या टपरीवर बसलो होतो. बिलोलीला जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. टपरीचं अंगण नुकतंच शेणानं शिंपडून घेतलेलं. त्याचे काही शिंतोडे मी बसलोय त्या बॅंचवर पडलेत. वेळ होवून गेली तरी बस येई ना म्हणून बाजूला बसलेल्या गावकऱ्याला विचारलं, त्याला उत्तर देत तो म्हणाला, 8 ची बस तर गेली की केव्हाच, आता पेपराच्या गाड्या येतात, त्यात बसून जा. पेपराच्या गाड्यांचा काही पत्ता नाही. मागच्या कित्येक दिवसांच्या प्रवासानं उत्साह म्हणावा तेवढा शिल्लक नव्हता. समोरून गेलेल्या एक   - दोन रेल्वेनं, गेटमनच्या फाटक चालू   - बंद करण्याच्या हालचालींनी तेवढंच वेळ निघून जात होता. समोर पेपर वाचत बसलेल्या माणसाच्या हातातल्या पेपरातली पहिल्या पानावरची राफेल घोटाळ्याची बातमी बसल्या बसल्या वाचून झाली होती. दुसरी रेल्वे निघून गेल्यानंतर उघडलेल्या फाटकातनं   इंडिगो कार टपरी समोर येवून उभी राहिली. कपालावर केसरी टिक्का लावलेला, गळ्यात भगवा गमजा घातलेल्या ड्रायव्हरनं विचारलं, नांदेड यायचंय का ? मी म्हणालो, बिलोलीला जायचंय. नांदेड तर नाही तर नाही बिल...

In The State of Fear

- Abhishek Bhosale  Heart is suffering by mischievous politics and Misconceived propaganda,  The past constantly denied our rights. State forced us to create our organisations, Then they tolds it threat to peace and law and order. Government refused to display the leaders of damage  And  Threatened to finish our political ideology. They distroyed all evidence of murder and hoax. Now it becomes necessary to shape new strategy and slogans. Without permanent justice and honour of the people, You are destroying the dogma of our society. It is necessary to restore the lost confidence in State of Fear. Liberate the honour of being obedient. Page 1 Page 2 Page 3 Page 4 (Abhishek Bhosale used prologue of Novel ‘The Gypsy Goddess’ had written by Meena Kandasamy for this erasure poetry. Meena Kandsamy used letter as prologue written by GopalKrishna Naidu on 1 st may 1968 to Madras government....