- अभिषेक भोसले
यवतमाळ महाराष्ट्राच्या मध्य पूर्व भागात वसलेलं आहे. सोबत दिलेल्या फोटोतील नकाशामध्ये जो निळ्या रंगाचा भूप्रदेश आहे तो यवतमाळचाच आहे. त्या भागाला विदर्भ असंही म्हणतात. म्हणजे यवतमाळपासून पलीकडं विदर्भच.
यवतमाळमध्ये अप्सरा, सरोज, राजकुमार, बरखा, दिप्ती, संजय, वर्षा, मंगला, शंकर तसंच ई-स्क्वेअर एलिमेन्ट्स या नावाची सिनेमागृहं आहेत. 2015 मध्ये राजवाडे अँड सन्स, 2016 मध्ये वजनदार आणि 2017 मध्ये गुलामजाम नावाचे सिनेमा या सिनेमागृहांमध्येही लागले होते.
यवतमाळ, दिग्रस, राळेगाव, बाभूळगाव, उमरखेड, कळंब, अरणी, महागाव, वणी, धारवा, केळापूर, मारगांव, नेर, झरी जमनी, पुसद इत्यादी तहसील या जिल्ह्यात आहेत. या सगळ्या ठिकाणी मिळून एकत्रित 2077144 एवढी आपल्यासारखीच माणसं राहतात. म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण माणसांच्या 2.63 टक्के. ही 2.63 टक्के माणसं मराठी बोलतात, ऐकतात, लिहितात. त्यामुळं वर नावं लिहिलेल्या सिनेमागृहांमध्ये जाऊन कधी कधी मराठी चित्रपटही पाहतात. काही माणसं गोंड राजा, गोंड प्रधान, कळम, आंध आणि बंजारा या आदिवासी समुदायातील असल्या कारणानं त्यांना गुलामजाम, राजवाडे अँड सन्स आणि वजनदार या चित्रपटात बोलल्या गेलेल्या मराठी सारखं मराठी येत नसलं तरी त्यातली काही माणसं सिनेमागृहात नक्कीच सिनेमा पाहायला जातात.
विदर्भातून पुण्या - मुंबईत येणाऱ्या वीजेचं नियंत्रण याच जिल्ह्यातील वणी येथील पॉवर स्टेशनमधून होतं. पु्ण्यात वापरात असलेल्या विजेच्या निर्मितीसाठीचा कोळसा विदर्भातून या ठिकाणी येतो. तिथून रेल्वेनंं राज्याच्या आणि देशाच्या इतर भागात पाठविला जातो. कोळश्यामुळं इथले रस्ते, माती, जमीन, पाणी काळंकुट्ट झालेलं दिसतं सोबत काळवंडलेली माणसं पण दिसतात.
इथली अर्थव्यवस्था मुख्यता: कापूस या पिकावर आधारलेली आहे. सेन्ट्रल मॉल, बिग बाझार किंवा पॅन्टालून्समध्ये विकले जाणारे किंवा अँमझॉनवरून येणारे कपडे हे जरी कॉटन किंग्स, जॉकी, पुमा, पोलो या ब्रँडच्या नावे येत असले तरी ते बनवायला कापूस लागतो. कदाचित आत्ता अंगावर घाततेल्या कापडातही यवतमाळचाच कापूस असेल. दुसरीकडं कुठं नातं नसलं तरी अंगावरच्या कपड्यापुरतं तरी आपलं यवतमाळशी नातं आहे.
कापूस या पिकाला पांढरं सोनं असंही म्हणतात. कारण ते शेतकऱ्याला जास्त उत्पन्न देणारं पीक आहे. पण मागच्या अनेक वर्षापासून कापूस हे पीक दगा देत आहे. त्यामुळं मला कधी कधी त्याला पांढरं विष असंही म्हणावं वाटतं. कारण यवतमाळमध्ये 2015 साली 386 तर 2016 साली 276 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यातील बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे.
यवतमाळमध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि सहस्त्रकुंड धबधबा ही नयनरम्य आणि निसर्गरम्य ठिकाणं आहेत. सहस्त्रकुंड धबधब्यातून 30 ते 40 फूट उंचीवरून पडणाऱ्या पाण्याच्या किंवा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातील चितळ, काळवीट, हायना, मोर, लांडगा, कोल्हा, नीळगाय, सांबर यांच्या सहवासातही अनौपचारिक गेट - टुगेदर्स केली जातात. त्यात गोळू - पोलू किंवा डायट डायट ही गाणीही गुणगुणता येतात. कंटाळा आला तर वजनदारचं मॅश अप पण सादर करण्यासाठी कोणी अडवत नाही. मोठ्या शहरात राहून निर्माण झालेल्या 'तगमग'ीतून पण 'मोकळे' होवू शकता. यासाठी फोन बुकींग पण करता येतं. यवतमाळचा एसटीडी कोड हा तीन अंकी नसून तो 07232 असा पाच अंकी आहे.

यातून यवतमाळ येथे असलेला विरोधाभास लक्षात आला.
ReplyDelete