Skip to main content

यवतमाळवर बोलू काही...

- अभिषेक भोसले
यवतमाळ महाराष्ट्राच्या मध्य पूर्व भागात वसलेलं आहे. सोबत दिलेल्या फोटोतील नकाशामध्ये जो निळ्या रंगाचा भूप्रदेश आहे तो यवतमाळचाच आहे. त्या भागाला विदर्भ असंही म्हणतात. म्हणजे यवतमाळपासून पलीकडं विदर्भच.
यवतमाळमध्ये अप्सरा, सरोज, राजकुमार, बरखा, दिप्ती, संजय, वर्षा, मंगला, शंकर तसंच ई-स्क्वेअर एलिमेन्ट्स या नावाची सिनेमागृहं आहेत. 2015 मध्ये राजवाडे अँड सन्स, 2016 मध्ये वजनदार आणि 2017 मध्ये गुलामजाम नावाचे सिनेमा या सिनेमागृहांमध्येही लागले होते.
यवतमाळ, दिग्रस, राळेगाव, बाभूळगाव, उमरखेड, कळंब, अरणी, महागाव, वणी, धारवा, केळापूर, मारगांव, नेर, झरी जमनी, पुसद इत्यादी तहसील या जिल्ह्यात आहेत. या सगळ्या ठिकाणी मिळून एकत्रित 2077144  एवढी आपल्यासारखीच माणसं राहतात. म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण माणसांच्या 2.63 टक्के. ही 2.63 टक्के माणसं मराठी बोलतात, ऐकतात, लिहितात. त्यामुळं वर नावं लिहिलेल्या सिनेमागृहांमध्ये जाऊन कधी कधी मराठी चित्रपटही पाहतात.  काही माणसं गोंड राजा, गोंड प्रधान, कळम, आंध आणि बंजारा या आदिवासी समुदायातील असल्या कारणानं त्यांना गुलामजाम, राजवाडे अँड सन्स आणि वजनदार या चित्रपटात बोलल्या गेलेल्या मराठी सारखं मराठी येत नसलं तरी त्यातली काही माणसं सिनेमागृहात नक्कीच सिनेमा पाहायला जातात. 
विदर्भातून पुण्या - मुंबईत येणाऱ्या वीजेचं नियंत्रण याच जिल्ह्यातील वणी येथील पॉवर स्टेशनमधून होतं. पु्ण्यात वापरात असलेल्या विजेच्या निर्मितीसाठीचा कोळसा विदर्भातून या ठिकाणी येतो. तिथून रेल्वेनंं राज्याच्या आणि देशाच्या इतर भागात पाठविला जातो. कोळश्यामुळं इथले रस्ते, माती, जमीन, पाणी काळंकुट्ट झालेलं दिसतं सोबत काळवंडलेली माणसं पण दिसतात.
इथली अर्थव्यवस्था मुख्यता: कापूस या पिकावर आधारलेली आहे. सेन्ट्रल मॉल, बिग बाझार किंवा पॅन्टालून्समध्ये विकले जाणारे किंवा अँमझॉनवरून येणारे कपडे हे जरी कॉटन किंग्स, जॉकी, पुमा, पोलो या ब्रँडच्या नावे येत असले तरी ते बनवायला कापूस लागतो. कदाचित आत्ता अंगावर घाततेल्या कापडातही यवतमाळचाच कापूस असेल. दुसरीकडं कुठं नातं नसलं तरी अंगावरच्या कपड्यापुरतं तरी आपलं यवतमाळशी नातं आहे.
कापूस या पिकाला पांढरं सोनं असंही म्हणतात. कारण ते शेतकऱ्याला जास्त उत्पन्न देणारं पीक आहे. पण मागच्या अनेक वर्षापासून कापूस हे पीक दगा देत आहे. त्यामुळं मला कधी कधी त्याला पांढरं विष असंही म्हणावं वाटतं. कारण यवतमाळमध्ये 2015 साली 386 तर 2016 साली 276 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यातील बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे.
यवतमाळमध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि सहस्त्रकुंड धबधबा ही नयनरम्य आणि निसर्गरम्य ठिकाणं आहेत. सहस्त्रकुंड धबधब्यातून 30 ते 40 फूट उंचीवरून पडणाऱ्या पाण्याच्या किंवा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातील चितळ, काळवीट, हायना, मोर, लांडगा, कोल्हा, नीळगाय, सांबर यांच्या सहवासातही अनौपचारिक गेट - टुगेदर्स केली जातात. त्यात गोळू - पोलू किंवा डायट डायट ही गाणीही गुणगुणता येतात. कंटाळा आला तर वजनदारचं मॅश अप पण सादर करण्यासाठी कोणी अडवत नाही. मोठ्या शहरात राहून निर्माण झालेल्या 'तगमग'ीतून पण 'मोकळे' होवू शकता. यासाठी फोन बुकींग पण करता येतं. यवतमाळचा एसटीडी कोड हा तीन अंकी नसून तो 07232 असा पाच अंकी आहे. 

Comments

  1. यातून यवतमाळ येथे असलेला विरोधाभास लक्षात आला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

MeToo कॅम्पेन आणि 'इरेझर पोएट्री'

- अभिषेक भोसले  ऑक्टोंबर महिन्यात अमेरिकेतील वर्तमानपत्रांची पानं नावाजलेल्या व्यक्तींवर केल्या गेलेल्या बलात्कार, विनयभंग आणि लैगिंक शोषणाच्या आरोपांनी भरलेली दिसत होती. ही प्रकरणं जशी समोर येऊ लागली तशी त्याची तीव्रताही जगाच्या लक्षात आली. यासर्व घडामोडीतून जन्म झाला MeToo या मोहिमेचा आणि सोशल मिडियावरील हॅशटॅगचा. मोठ्या प्रमाणात जगातील तरूणी – महिलांनी #MeToo चा वापर करून स्वता : वर झालेला विनयभंग, बलात्कार आणि लैगिक शोषणाचे अनुभव सोशल मिडियावर मांडले. अनेकांनी या सर्व प्रकरणांवर आपली मतं व्यक्त केली. काहींनी याला स्त्रीमुक्तीची चळवळ सांगितलं, काहींनी चळवळ म्हणणाऱ्याची खिल्ली उडवली. पण महिलांच्या आतमध्ये साचलेला काळाकुट्ट भूतकाळ या रूपानं किमान समोर आला.  सामान्य नागरिक, महिला, कार्यकर्त्या त्यांच्यापरीने या सर्व विषयांवर व्यक्त होत होत्या. इरेझर पोएट्रीवरील लेखकाचा लेख वाचण्यासाठी  "शब्द खोडून तयार झालेली राजकीय कविता" -  https://goo.gl/uZKy4d ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्या बहुतांश व्यक्ती ह्या नावाजलेल्या होत्या. त्यामुळं त्यातील अनेकांनी बच...

चेहऱ्यावरचे मुखवटे फक्त वेगळे

- अभिषेक भोसले सर्व पक्ष निवडणुकीचे उमेदवार जाहिर करण्यात व्यस्त आहेत. याद्यांवर याद्या प्रसिद्ध होत आहेत. वर्तमानपत्रांचे मथळे त्यासंंबधीच्या बातम्यांनी भरून जात आहेत. अशात काही महत्त्वाचे मथळे आपल्या नजरेतून सुटण्याची शक्यता आहे. त्यातला 24 मार्चचा बीबीसी संकेतस्थळावरचा हा एक मथळा ' कांग्रेस सरकार ने छत्तीसगढ़ में अडानी को दिया कोयला खदान का ठेका, उठे सवाल '  आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाची ही महत्त्वाची बातमी आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील गिधमुडी आणि पतुरिया  इथल्या कोळसा खाणी राज्य सरकारकडून अदाणी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्तीसगडमध्ये कॉग्रेसचं सरकार आहे.  हो, तेच कॉग्रेसचं सरकार ज्यांनी अदाणी समूहाला सातत्यानं विरोधी पक्ष असताना विरोध दर्शविला होता. राहूल गांधी हे त्या पक्षाचे महासचिव आहेत.  कॉग्रसेच महासचिवांनी 2015 मध्ये याच भागाचा दौरा करत तत्कालिन भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठ्या उद्योग समूहांना मदत मुद्दयावरून घेरलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप सरकार आदिवासींच्या जमिनी अद...

एबीसी ते मटा, लोकसत्ता - माध्यमांचं चारित्र्य आणि विश्वासार्हता

- अभिषेक भोसले  ब्रेयन रॉस यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल १. अमेरिका, वार - शनिवार, एबीसी वृत्तवाहिनीच्या वर्ल्ड न्यूज टूनाईट बातमीपत्राचं प्रसारण चालू झालेलंं होतं. वृत्तवाहिनीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पणाला लागलेली असताना न्यूजरूममधील वातावरण एकदम गंभीर. एबीसी वृत्तवाहिनीसाठी २० दशकांपासून कार्यरत असलेला आणि शोध पत्रकारितेतील महत्त्वाचं नाव असलेला पत्रकार ब्रायन रॉस बातमीपत्रात येतो. काल म्हणजे शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या बातमीतील काही तथ्य चुकीचे असल्याचा खुलासा करतो. जाहिररित्या देशाची माफी मागतो. तो माफीनामा थेट प्रसारित करण्यात येतो. वृत्तवाहिनीच्या विश्वासार्हतेला लागलेल्या सुरूंगातून सावरण्याचा एबीसी वृत्तवाहिनीचा हा माझ्या दृष्टीकोनातून स्वागतार्हाय प्रयत्न  लोकसत्ताचे संपादक गिरिष कुबेर यांचं संग्रहित छायाचित्र स्रोत - गुगल  २. तीच तारीख, तोच वार, फक्त देश मात्र वेगळा. स्थळ - मुंबई. माध्यमं जागतिक नाहीत मात्र प्रादेशिक. नाव - लोकसत्ता, महानगर, जनशक्ती आणि महाराष्ट्र ट...